गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न
संजीव भांबोरे
गोंदिया (ऑल इंडिया प्रतिनिधी ) :- आज दि. 01/9/ 2022 रोज गुरुवार ला दुपारी 2 वाजता राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची गोंदिया जिल्हातील बैठक आदरणीय डॉ. खुशालजी बोपचे माजी खासदार तथा अध्यक्ष / राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया जिल्हातील आमगाव तालुका साईलॉन या ठिकाणी संपन्न झाली. तसेच गणेशभाऊ पारधी राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा व तालुकातील पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. भंडारा जिल्हा महासचिवपदी जितेंद्र पारधी ,देवरी तालुका अध्यक्ष पदी सुनील चौधरी , लखनलाल मछिंरके यांची नियुक्ती सालेकसा तालुका अध्यक्ष पदी , सत्यनारायण मच्छिरके सालेकसा तालुका सचिव पदी , श्विजय शेंडे आमगाव तालुका उपाध्यक्षपदी , आशिष पारधी आमगाव तालुका उपाध्यक्ष पदी , भोलेशंकर लिल्हारे सालेकसा तालुका सहसचिव पदी ,सौ. संतकला तूरकर आमगाव तालुका महिला महासचिव, सौ. रेखा ताई मेश्राम आमगाव तालुका महिला सचिव , सौ. आभाताई बैस आमगाव तालुका महिला अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित गणेशभाऊ पारधी राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, भूमेश्वरजी कटरे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव , सौ. आभा ताईबैस, सौ. उषाताई ठाकरे, सौ. नूरनिशाद खान, मा. श्री. देवराज जी गौतम जिल्हा सचिव गोंदिया सौ. रवींद्र जी पटले, बिसेन सर, देवेंद्र जी दमाहे, विजय दमाहे , विजय बघेले, पंकज पारधी , जितेंद्र जी पारधी , प्रशांत भाऊ गायधणे, विजय रहांगडाले व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न"
एक टिप्पणी भेजें