शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व विद्यार्थी यांच्या वाढदिवसानिमित्त रजिस्टर ,पेन व गोड जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता
संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाळ येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोजभाऊ वैरागडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य निलेशभाऊ काटेखाये व शा.व्य.स. सदस्य नरेंद्र बिलवणे त्याचप्रमाणे शाळेतील दोन विद्यार्थी आरजू हातेल व अन्वेश रामटेके यांचा वाढदिवस दिनांक 23 ऑगस्ट 2022 ला अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. अतिशय कार्यतत्पर व शाळेच्या प्रगतीकरिता अविरत झटणारे शा.व्य.स.चे अध्यक्ष तथा सदस्य यांच्या शिक्षकांना नेहमी अभिमान वाटतो. शाळेच्या बाबतीत कुठलीही समस्या असो किंवा शिक्षकांना आलेली अडचण असो समितीतील सर्व सदस्य तत्परता दाखवून सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. शाळेच्या भौतिक सुविधांची पूर्तता स्वत: जातीने लक्ष घालून पूर्ण करतात. आजसुद्धा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील 150 विद्यार्थ्यांना रजिस्टरचे वाटप त्यांनी केले.आम्ही सर्व शिक्षकवृंद त्यांचे नेहमीच ऋणी राहणार. सरपंच लोपमुद्रा मनोज वैरागडे यांनी तिघांचेही औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अणेराव मॅडम, केंद्रप्रमुख भाकरे जि.प.हाय.चे प्राचार्य आ.ढवळे तथा शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे जि.प.हाय.चिचाळ येथील NMMS परीक्षेत गुणवत्ता प्राप्त तीन विद्यार्थीनींचे आशिषभाऊ मेश्राम सदस्य ग्रा.पं. चिचाळ यांनी आपल्याकडून वही व पेन देऊन कौतुक केले. मोटघरे मॅडम यांचेकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्य गोड जेवण देण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे शिक्षकांनी आभार मानले.
0 Response to "शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व विद्यार्थी यांच्या वाढदिवसानिमित्त रजिस्टर ,पेन व गोड जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता"
एक टिप्पणी भेजें