-->

फ़ॉलोअर

पक्षाची धेय्य,धोरणे आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा - प्रफुल पटेल

पक्षाची धेय्य,धोरणे आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा - प्रफुल पटेल

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक


गोंदिया :-  जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्ता बैठक खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल बोलतांना म्हणाले की, कुणाचीही सत्ता ही कधीच कायम नसते ती येत जात असते. सत्ता असो वा नसो पण पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेहमीच जनहिताची कामे करीत राहिले पाहिजे. जनतेच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पक्षाची ध्येय, धोरणे आणि राबविण्यात येणारी विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावी असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले. खा.श्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. या दोन्ही जिल्हांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासून सत्तेपेक्षा जनहिताला प्राधान्य दिले आहे. जनहिताची कामे करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुध्दा सदैव तत्पर असले पाहिजे. जनतेला आपण त्यांच्या सुख, दु:खात सदैव त्यांच्यासोबत आहोत याची जाणीव झाली पाहिजे असे कार्य कार्यकर्त्यांनी करावे. जिल्ह्यात आगामी नगर परिषदेच्या व नगर पंचायतच्या निवडणुका होवू घातल्या असून यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच सदस्यता नोंदणी अभियानातंर्गत जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करण्याची जबाबदारी ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचे खा.श्री पटेल यांनी सांगितले. यासभेला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, जिलाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, डॉ खुशाल बोपचे, श्री नरेश माहेश्वरी, श्री यशवंत गणवीर, श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, श्रीमती पुजा सेठ, श्री केतन तुरकर, डॉ योगेद्र भगत, श्री रमेश ताराम, श्री विनोद हरिनखेड़े, श्री देवेंद्रनाथ चौबे, श्री अशोक सहारे, श्री दामोदर अग्रवाल, श्री हुकुम अग्रवाल, श्री तेजराम मडावी, श्रीमती मंजुषा बारसागडे, श्री निरज उपवंशी, श्री कुंदन कटारे, श्री बाळकृष्ण पटले, श्री अविनाश काशीवार, श्री प्रेमकुमार रहांगडाले, श्री सी.के.बिसेन, श्री लोकपाल गहाणे, श्री केवल बघेले, डॉ अजय उमाठे, श्री कमल बहेकार, श्री प्रभाकर दोनोडे, श्री रफिक खान, श्री अविनाश जायस्वाल, श्री गणेश बरडे, श्री रविकांत बोपचे, श्री विशाल शेंडे, श्री सुरेश हर्षे, श्री कृष्णकुमार बिसेन, श्री अशोक सहारे, श्री मनोज डोंगरे, श्री मोहन पटले सहित शेकडोंच्या संख्येने जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्त्ता उपस्थित होते.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या कुशल नेतृत्वावर व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये तिरोड़ा येथील श्री भोजराज धामेचा व नेहा तरारे, गोंदिया येथील वसंत मुरकुटे,नाशिर शेख, नरेंद्र गढ़पायले,सालेकसा येथील प्राचार्य सागर काटेखाये व श्री बाजीराव तरोने, यांचा पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला


0 Response to "पक्षाची धेय्य,धोरणे आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा - प्रफुल पटेल"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article