विमलताई बाबुराव नान्हे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
भंडारा (पहेला) :- येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचारी विमलताई बाबुराव नान्हे यांचा 31 ऑगस्ट 2022 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र पहेला येथे सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता .या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले होते .तर उपाध्यक्षपदी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बँक व्यवस्थापक करवाडे ,बँक संघटनेचे प्रतिनिधी नारायणे, लेखापाल काटगाये ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळेस सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्याचप्रमाणे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सत्कार निरोप समारंभ कार्यक्रमात विमलताई यांचा सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ ,साळी -चोळी देऊन सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सेवा निवृत्ती नंतर मनुष्य थकतो व आपल्याला कोणतेच काम नसते परंतु हा गैरसमज मनात न बाळगता सेवानिवृत्तीनंतर सुद्धा समाजसेवा करण्याची जिद्द मनात बाळगावी असे सांगितले .त्याचप्रमाणे मार्गदर्शन करताना राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी सांगितले की ,ज्यांनी 28 वर्ष 4 महिने एकाच ठिकाणी राहून अविरत सेवा तर दिली .परंतु एकीकडे पतीच्या निर्णयानंतर छोटे छोटे चार मुले व एक मुलगी असताना सुद्धा मुलांच्या सांभाळ करून बँकेची सेवा करणे ही त्यांच्या जीवनातील एक तारेवरची कसरतच होती. परंतु असे कठीण परिस्थितीत त्यांनी बँकेला उत्तम सेवा दिली आणि त्यांचे असे हे कार्य सेवानिवृत्ती सुद्धा नंतर सुद्धा अविरत चालत राहो कारण सेवा निवृत्त झाल्यानंतर मनुष्य थकत नसतो तर त्यांनी आपला मुले नातवंडे यातच खर्च न करता समाजकार्य करिता सुद्धा खर्च करावे असे यावेळी त्यांनी सांगितले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे भंडारा तालुका अध्यक्ष कुलदीप गंधे, अपेक्षा सार्वे ,राजकुमार रावल, बोधराज भोयर, मंगेश जनबंधू ,अविराज दहिवले ,आदित्य तिरपुडे ,संतोष रावल, संजय तिरपुडे ,पठाण, श्रावण भुजाडे ,राजेश मेश्राम, प्रमोद नखाते, भगवान दहिवले, भरतकर मॅडम बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी, व्यापारी वर्ग, ग्राहक वर्ग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन विलास बांडेबुचे यांनी तर आभार दिनेश आजबले यांनी मानले.
0 Response to "विमलताई बाबुराव नान्हे यांचा सेवानिवृत्ती सत्कार"
एक टिप्पणी भेजें