कासेगाव गटातुन समाजसेवक युवा नेते नितीन काळे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी युवकांची मागणी
संजीव भांबोरे
सोलापूर (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- तावशी गावचे सुपुत्र ज्यांची ओळख संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात समाजसेवक म्हणून असलेले सर्वांच्या मदतीला धावून जाणारे नितीन काळे यांनी कासेगाव गटातुन जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी युवकांची आग्रहाची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन काळे हे सातत्याने जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात झाले. त्यांना कमी वयात 40 पुरस्कार देखील मिळाले. ज्या वेळी कोरोना सारखा महाभयंकर रोग आला होता त्यावेळी देखील नितीन काळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना व नातेवाईकांना आधार देण्याचे व सेवा देण्याचे काम केले.. सध्या त्यांनी निवडणूक लढवुन गटातील जनतेला न्याय मिळवून देतील व या गटातील गावांचा विकास नक्कीच होईल म्हणून सर्वसामान्य माणसाला उमेदवारी पक्षाने देऊन त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशीही मागणी होत आहे.. नितीन काळे यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. पण त्यांनी घरदार सोडून गेल्या काही वर्षांपासून ते जनतेची युवकांच्या प्रश्नांसाठी ते लढत आहेत.. त्यांचा दांडगा जनसंपर्कही आहे. त्यांनी अनेक प्रस्थापित यांना घाम फोडुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.. त्यांनी कमी वयात अनेक आंदोलने केली व न्याय मिळवून दिला.. त्यांनी सामान्य जनतेची सेवा करत असताना ते कोणत्याही आमिषाला कधी बळी पडलेले नाहीत.. त्यांच्या कार्याचा गौरव कोणता पक्ष उमेदवारी देऊन करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कासेगाव गटात तावशी तनाळी एकलासपुर कासेगाव शेटफळ अनवली अशा गावांचा समावेश आहे . व प्रत्येक गावात नितीन काळे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने ते नक्कीच विजयी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.. सर्वात तरुण वयाचा उमेदवार म्हणून नितीन काळे यांच्याकडे बघितले आहे.. एका सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला पक्ष बळ देऊन उमेदवारी देईल का अशी उत्सुकता लागलेली आहे.. कासेगाव गटात ओबीसी पुरूष आरक्षण पडलेले आहे त्यामुळे ओबीसी सक्षम युवा नेतृत्व म्हणून नितीन काळे यांच्याकडे पाहिले जाते.
0 Response to "कासेगाव गटातुन समाजसेवक युवा नेते नितीन काळे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी युवकांची मागणी"
एक टिप्पणी भेजें