माजी खासदार तथा ओबीसी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन भंडारा येथे बैठक संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (आल इंडिया प्रतिनिधी ) :- गुरुवार ला दुपारी 1 वाजता राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची भंडारा जिल्हाची प्रथम कार्यकारणीची बैठक संपन्न झाली आहे. बैठकी मध्ये माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे उद्देश कार्य आणि पक्ष संघटना बद्दल मार्गदर्शन केले. प्रामुख्याने ओबीसीचि जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. त्यांचप्रमाणे नॉनक्रीमिलेयरचि अट रद्द करणे त्याच प्रमाणे या देशामध्ये शेतकऱ्यांना शेत मलाचे भाव उत्पादन खर्चाच्या आधारावर कधीच मिळाले नाही. कदाचित ते मिळणार ही नाही म्हणून त्यांचे उत्पादन हे राष्ट्रीय उत्पादन म्हणून शेतकरी आणि त्याचा शेतामध्ये काम करणारा शेत मजूर ह्यांना वयाच्या 55 वर्षा नंतर किमान 5000 ₹ पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
बैठकीमध्ये राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाच्या काही पदाधिकारांची नियुक्ती करण्यात आली. या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजीव भांबोरे नियुक्ती करण्यात आली .सुरेश टेंभरे यांची भंडारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नीलम चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश युवती सचिव पदी नियुक्ती करण्यात आली . कुलदीप गंधे यांची भंडारा तालुका अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली. नीलमताई चव्हाण यांची निवड महाराष्ट्र प्रदेश युवती सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली . शोभनाताई गौरशेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्य महिला आघाडी उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .तसेच शोभनाताई गौरशेट्टीवर यांचे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . वनिता ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला महासचिव पदी ,नीलम चौहान युवती सचिव महाराष्ट्र प्रदेश पदी , शोभनाताई गौरशेट्टीवर यांची प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यात आली . यावेळी गणेश पारधी राष्ट्रीय उपाध्यक्ष बहुजन महासंघ, भूमेश्वर कटरे कार्यालयीन सचिव ,भोजराज गभणे, प्रवीण ठाकरे, मोईन शेख, बाबा पाठेकर, बंडूभाऊ चेतूले, श्रीराम शेलोकर, अशोक अतकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "माजी खासदार तथा ओबीसी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन भंडारा येथे बैठक संपन्न"
एक टिप्पणी भेजें