-->

फ़ॉलोअर

अड्याळ ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दिलीप सोनुले यांची निव

अड्याळ ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दिलीप सोनुले यांची निव

 

संजीव भांबोरे

भंडारा( ऑल इंडिया प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वात मोठी असलेली अड्याळ ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत  आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोज बुधवार ला दुपारी 1 वाजता सरपंच जयश्री कुंभलकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत तीन नागरिकांनी तंटामुक्त अध्यक्ष पदाकरिता अर्ज  अनुक्रमे मुन्ना बोदलकर, अमोल उराडे, दिलीप सोनुले, यांनी अर्ज सादर केले होते या तिन्ही उमेदवारांपैकी कुणी अर्ज मागे न घेतल्यामुळे शेवटी ग्रामसभेत मतदान घेण्यात आले .यात दिलीप सोनुले यांना 81 मते , मुन्ना बोदलकर यांना 56 मते , तर अमोल उराडे यांना 51 मतदान मिळाले .यात दिलीप हरीश सोनुले सेवानिवृत्त कर्मचारी हे 21 मतांनी विजयी झाले .त्यांनी एका मुलाखतीत आपण सर्वसामान्य जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यापूर्वीचे तंटामुक्ती अध्यक्ष मुन्ना बोदलकर हे सुद्धा यापूर्वी तीन वर्ष सतत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सुद्धा अनेकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क केला असता या नागरिकांनी मला मतदान केलं त्यांचे ऋणी असल्याचे सांगितले व असेच प्रेम मिळत राहो असे सुद्धा ते म्हणाले .यावेळी बरेच ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Response to "अड्याळ ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दिलीप सोनुले यांची निव"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article