"त्या नराधमांना जाहीर फाशी द्या" विहिप मातृशक्तीचा एल्गार (राष्ट्रपतींना निवेदन)
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) :- केवळ भंडारा जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याला हाद्रविणारी असाह्य स्त्रीवर अत्याचार घटनेतील आरोपींना सर्वसमक्ष जाहीर फाशी द्यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्तीने एका निवेदनातून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे .
ज्या देशात स्त्री पूजनीय मानली जाते त्या देशात स्त्रीवर होणारे अत्याचाराचे सत्र थांबायचे असेल तर अश्या आरोपींना सर्व समक्ष जाहीर फाशी द्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी द्वारे राष्ट्रपतींना देण्यात आले.
यात मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका कांचनताई ठाकरे यांच्यासोबत विभाग प्रमुख दीपाताई नायर, जिल्हाप्रमुख मेघाताई ऐकापूरे ,अनुराधाताई माने ,पूजा कूंभरे, याशिवाय जिल्हा भंडारा जिल्हाध्यक्ष विजयजी पोहरकर आणि उपाध्यक्ष करमसीभाई पटेल उपस्थित होते .
देशात अशा प्रकारे वारंवार होणारे हे अत्याचार सत्र द्रूतगतीने न्यायालयाने त्वरित निकालात काढावीत आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हयातील वकिलांनी आरोपी ची केस घेवू नये व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात उभे राहावे असे आवाहन मातृशक्ती तर्फे करण्यात आले.
0 Response to ""त्या नराधमांना जाहीर फाशी द्या" विहिप मातृशक्तीचा एल्गार (राष्ट्रपतींना निवेदन)"
एक टिप्पणी भेजें