प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन
संजीव भांबोरे
पिंपरी चिंचवड (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. निगडी भक्ती शक्ती येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष रणसिंग, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून कामगारांचे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. यावेळी माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Response to "प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी"
एक टिप्पणी भेजें