-->

फ़ॉलोअर

तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

 


तुमसर :- तुमसर येथे  मातोश्री लोन मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बैठक आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये पक्षप्रवेश केला,  त्यांना पक्षाच्या दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, प्रामुख्याने राज्यातील व मुख्यतः जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली,येणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे निवडणुकीला घेऊन रणनीती कशी आखायची व जास्तीत जास्त नगरसेवक-नगरसेविका राष्ट्रवादी पक्षाचे कसे निवडून येतील व त्यासाठी पुढची रणनीती काय अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले की सर्वांनी एकजूट होऊन येणाऱ्या नगरपालिकेला समोर जाणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व प्रभागाच्या प्रमुखांनी प्रत्येक प्रभागात बैठकी आयोजित करून जनतेच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करायचा प्रयत्न करावे,  कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र,मा.खासदार मधुकरजी कुकडे, तालुकाध्यक्ष देवचंदजी ठाकरे, माजी नगराध्यक्ष अभिषेकजी कारेमोरे, शहरध्यक्ष राजेशजी देशमुख, योगेशभाऊ सिंगंजुडे, यासीनभाई छवारे, पमाताई  ठाकुर,सरोजताई  भुरे,सुनील थोटे, सागर गभने, खेमराज गभने, सलाम तुरक, तिलक गजभिये, गुलराज कुंडवानी, जयश्रीताई  गभने, चोपकर ताई, जयंत भोयर, तोषल बुरडे, प्रकाश बिशने, संदीप पेठे, निशिकांत पेठे, वाडा समरीत, नानु परमार, प्रदीप भरणेकर, संकेत गजभिये, साठवणे, महेश लिमजे, विक्रम लांजेवार,व प्रमुख पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article