भारतात पारतंत्र्या चे वारे. लोकशाही धोक्यात .......
सुमारे 8वर्षांपूर्वी केंद्रात मोदी शहा चे सरकार आल्या पासून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविण्याचा कार्यक्रम राबवित आहे. देशात या दोघांची हुकमशाही आणली जात आहे. CBI,ED, न्यायालये, निवडणूक आयोग यासारख्या स्वायत्त संस्था असो कि देशाची आर्थिक संस्था RBI असो यांचं स्वतंत्र अस्तित्व संपवलं जात आहे. हीच पद्दत हिटलर ने अवलंबली होती. आज चीन, रशिया त्याच मार्गावरून जातआहे. अश्या व्यवस्थे मध्ये विरोधी पक्षांना संपवून टाकायचे काम सर्वात अगोदर केले जाते. वरील सर्व यंत्रणा हातात असतील व शेवटी अग्नी वीर म्हणजे भाड्याची सेना असेल तर देशात हुकूमशाही व्यवस्था आणण्यापासून कोणी रोकु शकत नाही. म्हणून मोदी, शहांनी पहिला नारा दिला होता काँग्रेस मुक्त भारत. एकदा काँग्रेस संपली कि राहिलेल्या पक्षांना किती वेळ लागणार. त्यानंतर वरील सर्व स्वायत्त संस्था यांनी ताब्यात घेतल्या. म्हणजे या देशात लोकशाही फक्त नावाला उरली आहे. जनतेसाठी शेवटचा पर्याय होता न्यायालय. अलीकडच्या म्हणजे बाबरी निकाला पासून आजपर्यंत हे सांगतील तेच न्यायालयात घडले. त्यामुळे जो कोणी त्याविरुद्द बोलेल तो देशद्रोही ठरविला जात आहे. आता यांनी या सर्व संस्थांच्या नावाच्या वर बीजे पी द्वारा संचालित कार्यालये असा बोर्ड लावावा म्हणजे विरोधी पक्षांचा वेळ व पैसा खर्च होणार नाही. वोटींग मशिनी त्या व्यवस्थे चाच भाग असले मुले, आता कुणाच्या हातात काहीच राहिले नाही. घास कोरडा करून काही फायदा नाही. एका शायरने अश्या व्यवस्थे बद्दल म्हटले आहे,, फिर्यादी भी वही, खुनी भी वही, दरोगा भी वही और अदालत भी वही. मै अपने खून का इलाजांम लागाउ तो किसपर,,, अशी आता सर्वांची म्हणजे बी. जे. पी. सोडून सर्वांची परिस्थिती दिसत आहे. या लाटेत जे वैचारिक, तत्वाशी तडजोड करणारे नाही ते लढत आहे व यातना भोगत आहे तर ज्यांनी बेईमानी करून संपत्त्या जमविल्या ते सर्व सुरक्षित ठिकाण म्हणून बी. जे. पी. जॉईन करीत आहे. पैशे कमवायचे चला बी जे. पी मध्ये कमावलेला सुरक्षित करायचा चला बी जे पी मध्ये. असा आजच्या राजकारणाचा ट्रेंड आहे. तो या देशाला कोठे घेऊन जाणार हे काळच ठरवेन.....
विचार संकलन
एम.बी.कोहाडे
0 Response to "भारतात पारतंत्र्या चे वारे. लोकशाही धोक्यात ......."
एक टिप्पणी भेजें