अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य नियुक्ती करा- याकरिता महाराष्ट्राचे राज्यपाल ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन
दिगंबर देशभ्रतार ज्येष्ठ पत्रकार
भंडारा :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजसेवक, पत्रकार संजीव भांबोरे यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्य राज्यपाल अधिस्वीकृती नियुक्त करण्यात यावी असे मागणी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,यांना ईमेल द्वारे 12 जुलै 2022 ला ईमेल द्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनात केली आहे निवेदनात सन 1991 ची स्थापना असून सामाजिक क्रांतिकारी संघटनेचे नाव स्वरूप बदलून सन 2002 ला अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटना संपूर्ण भारत 2002 पासून कार्यान्वित आहे. ही संघटना नोंदणीकृत असून संघटनेमार्फत भारतीय संस्कृती व महापुरुषांचे आदर्श समाजापुढे ठेवून महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत सन 1991 पासून वर्ग दुसरी ते सातवीपर्यंत शेकडो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करा उज्वल भविष्य करा अभियान राबवून विद्यार्थ्यांना घडविले. तसेच मुंबई नॅशनल बोर्ड द्वारा जीवनकला टेक्निकल इंटरेस्टेड च्या माध्यमातून कला व कौशल्याचा प्रशिक्षण राबवून शेकडो विद्यार्थ्यांना दरवर्षी घडवत असून निराश्रीत, अपंग, निराधार , वृद्धांसाठी निलादेवी मातोश्री वृद्धाश्रमाची सोय करून त्यांना स्वयंपूर्ण पालन ,पोषण राहण्याची सोय केली. स्त्रियांसाठी जीवन मंजुषा निराश्रीत गृहाची वेबस ,लाचार, विधवा, स्त्रियांना सुद्धा आश्रयस्थान देऊन त्यांना स्वामित्व घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत .तसेच दिव्यांगाची ,अपंगाचे ,शेतकऱ्यांचे ,मजुरांची हात, कामगारांचे , बिडी मजुरांचे प्रश्न, त्यांचे न्याय हक्कासाठी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न गावापासून राज्याचे संपूर्ण देशपातळीवर लढा देण्याचे कार्य करीत आहेत. संस्था व संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष समाजसेवक पत्रकार संजीव भांबोरे सामाजिक ,आर्थिक ,राजकीय, पत्रकारिता, क्षेत्राच्या माध्यमातून लोकांचे समस्यांचे निराकरण सामाजिक रूपाने करत असतात .त्यामुळे त्यांना अनेक संघटनांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येत आहे. त्यांच्या संघटनात्मक, सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनात्मक पदाधिकारी या नात्याने विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार राज्यपाल अधिस्वीकृती सदस्य नियुक्ती करण्यात यावे .असे मागणीचे निवेदन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक/ सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी एका निवेदनाद्वारे केलेली आहे.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य नियुक्ती करा- याकरिता महाराष्ट्राचे राज्यपाल ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन"
एक टिप्पणी भेजें