-->

फ़ॉलोअर

बौद्ध मुलीला वीष पाजून हत्या केल्याचा ऑल इंडिया  पॅंथर सेनेचा आरोप

बौद्ध मुलीला वीष पाजून हत्या केल्याचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा आरोप

 हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील महाळशी येथील घटना


संजीव भांबोरे (ऑल इंडिया प्रतिनिधी )
हिंगोली :- बौध्द मुलीचे विष पाजून हत्याकांड घडल्याची घटना महाळशी, ता. सेनगाव, जि हिंगोली येते घडली आहे. रमाईच्या लेकीला हळहळ करून मारून टाकले आहे. वडील सांगता सांगता रडायला लागले. 19 वर्षीय दीक्षा आणि 24 वर्षीय आरोपी सचिन रामेश्वर बरडे यांचं प्रेम होतं. गेली तीन वर्ष तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या शरीराचा भोग घेत होता, बलात्कार करत होता. दीक्षा निरागस, बौध्द कुटुंबातील तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. जेव्हा वडिलांना कळले तेव्हा वडिलांनी तिला सतर्क केलं. हे लोक फसवत असतात आपण गरीब आहोत, हे स्वतःला पाटील समजतात त्यांना जातीचा माज आहे आपल्यासोबत धोका होईल. 
11 जुलैला वडील शेतात गेले असता. मुलगी एकटी घरी होती, तिचा लहान भाऊ घरी होता. आरोपी तिला घरी घेऊन गेला, घरी तिच्यासोबत थंड डोक्याने घडवलेला प्लॅन अंमलात आणला गेला. वडील सांगतात की तिला 3 महिने गेलते. त्यांनी तिला पाण्यात एक दवा दिली आहे त्याने तुझा गर्भपात होईल आपण काही दिवसात लग्न करू असे त्यांनी तिला गोड बोलून फसवले. तिने प्रेमापोटी विश्वासाने ते पिले. तिला चकरा येऊ लागल्या. मुलीच्या घरी गजानन देवकर नामक इसम मुलीच्या वडिलांना बोलवायला आला, वडिलांनी मुलाच्या घरी धाव घेतली. मुलगी बोलत होती तिने स्पष्ट सांगितले की यांनी काही तरी पाण्यात पाजले. 
घाबरलेल्या वडिलांनी मुलीला वाचवण्यासाठी तिला दवाखान्यात हलवल, रस्त्यात त्यांना गाडी आडवी लावून, आरोपी सचिन बरडे चे वडील रामेश्वर बरडे याने मुलीच्या वडिलांना धमकी दिली की तुझ्या मुलीला समजून सांग ही महारीन तुझी मुलगी पाटलाची सून करून घेऊ का? आता वाचली तर सोडणार नाही अशी धमकी सुद्धा दिली. वडील घाबरलेले मुलीची अवस्था बिकट होत चाललेली. त्यांनी तिला रीसोडला आणलं, खाजगी दवाखान्यात दाखल केले. रिसोड चा डॉ. शिंदे हॉस्पिटल हा सुद्धा आरोपीच्या जवळचा निघाला. मुलीला admit केले तेवढ्यात पाठीमागून आरोपीचे नातेवाईक 8 ते 10 जण त्या हॉस्पिटलमधे आले. ते त्याच दवाखान्यात थांबले. रात्री दोन वाजता oxygen काढून घेतले यावर मुलीच्या वडिलांनी विचारले सुद्धा पण डॉक्टर उडवा उडवी करत होता. मी डॉक्टर की तुम्ही असं म्हणून त्यांना गप्प करायचा. आज आमच्या पहुण्यामुळे मी रात्री 2 पर्यंत थांबलो असं ही तो बोलला. 
रात्रभर काहीच केलं नाही, सकाळी मुलीचे वडिलांना मुलगी सिरियस होताना दिसली आणि त्यांनी डॉक्टर शिंदेच्या पाया पडले, मुलीची आई वडील गया वाया करत होते, डॉक्टर काही तरी करा म्हणत होते. डॉक्टर म्हंटला मुलीला घेऊन जा. कुठेही न्या येथे काही होणार नाही. ओझोन हॉस्पिटलला पोरगी नेली तिथे डॉक्टर म्हंटले मुलगी गेलेली आहे. 
पोलीस आले पंचनामा केला, सरकारी दवाखान्यात बॉडी नेली. तिथेही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मुलीने विष पिले अशी नोंद करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा कुटुंबाने अक्षेप घेतला तेव्हा तिला विष पाजले लिहिले गेले.
बॉडी घेऊन वडील पोलीस स्टेशनला गेले, आरोपींवर कार्यवाहीची मागणी केली. पोलीस स्टेशनला पाटील नामक मॅडम आहेत त्यांनी गोड बोलून मुलीच्या वडिलांची समजूत काढली. मी शब्द देते तुम्ही बॉडी घेऊन जा, आधीच तिचे खुप हाल झालेत आता मेल्यावर पण हाल करणार का असे भावनिक बोलून प्रेत अंत्यविधी करायला लावला. पुन्हा पीडितांना नीट सहयोग त्यांनी केला नाही. वेळ मारून नेली. 
गोरेगाव, ता. सेनगाव पोलीस स्टेशन येथील हे प्रकरण आहे. चार आरोपींवर अट्रोसिटी ॲक्ट, 306 अंतर्गत कार्यवाही झाली. दोन आरोपींना अटक केले तर दोन आरोपी फरार दाखवले आहेत. वडील सांगता सांगता अनेक वेळा रडत होते. 
3 वर्ष मुलीचा वापर केला आणि लग्नाच्या वेळेला ती महार असल्याचे जाणवले. 
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत असून हे प्रकरण अतिशय गंभीर संतापजनक आहे. जातीमुळे ही हत्या झालेली आहे, अतिशय थंड डोक्याने क्रूरपणे हे हत्याकांड घडवलेले आहे. पैसा, नातेवाईक, राजकीय ताकद वापरून हे प्रकरण दडपण्याचा खोडसाळपणा केलेला आहे. 
या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, खुनाचा 302 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, शिंदे हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे, डॉ. शिंदे आरोपीचा नातेवाईक असल्याचे पीडित सांगत आहेत. अशा प्रकरणात तात्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचं असताना 15 तास का लावले? हॉस्पिटल मधे आलेले त्या आरोपीचे नातेवाईकांची चौकशी झाली पाहिजे. ती जिवंत राहिली असती तर जबाब दिला असता आणि पुरावा मिळाला असता म्हणून त्या हॉस्पिटल मधे तिला संपवले का याचाही तपास झाला पाहिजे. 
मुलगी तीन महिन्याची प्रेग्नेंट असल्याचे समजतय त्यासाठी तात्काळ पोस्ट मोर्टम रिपोर्ट द्यावा आणि 376 सुद्धा दाखल करावी. 
या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपिंवर 302 अंतर्गत कार्यवाही करावी. तात्काळ जर कार्यवाही न केल्यास हिंगोली सहित राज्यभर मोर्चा काढून उत्तर दिले जाईल! 
पिडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पँथर सेना करीत आहे

0 Response to "बौद्ध मुलीला वीष पाजून हत्या केल्याचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा आरोप"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article