नुकशानग्रस्त शेतीचे तात्काल पंचनामे करून आर्थिक मदत द्या.आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
उपविभागीय कार्यालय तुमसर येथे आज दिनांक 26 जुलै 2022 ला सकाळी 10 वाजता तुमसर तालुका, मोहाडी तालुका आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अतिवृष्टी, पूर, यामध्ये शेती, घर यांचे खूप प्रमाणात नुकशान झाले असून याचे तात्काल पंचनामे करून नुकशान ग्रस्त लाभार्थी यांना तात्काल देण्यात यावे अशे निर्देश आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी प्रमुख अधिकारी सभेत निर्देश दिले.
दोन्ही तालुक्यात वीज मुळे जे मरण पावले, काही किरकोळ जखमी झाले त्यांनाही तात्काळ मदत द्या असे आमदार साहेब म्हणाले तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करा.बहुतेक शेतकऱ्यांचे अजून प्रयन्त धान विक्री झाली नाहीं करिता तात्काल उपाययोजना करून धान खरेदी करण्याचे सुचविले, श्रावणबाळ, विधवा, अपंग, परीतकत्या, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थी यांचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे असे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांन्हा निर्धारित भावातच खत मिळावे यासाठी कृषी अधिकारी यांही जातीने लक्ष द्यावे. खताचा काळाबाजार होऊ नये व शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावे उपस्थितीत अधिकारी सूचना दिल्या त्याप्रसंगी
देवचंद ठाकरे तुमसर तालुका अध्यक्ष, राजू माटे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल,सदाशिव ढेंगे तालुका अध्यक्ष मोहाडी ,रितेश वासनिक सभापती मोहाडी , उमेश तूरकर,महादेव पचघरे जिल्हापरिषद सदस्य, परमेश्वर नलगोपुलवार,विजय बारई,पस सदस्य बाणा सव्वालाखे, ड्रा सुनील चवले, इंजि. सचिन कारेमोरे, पस सदस्य प्रीतीताई शेंडे, जयश्री गभने,सुभाष गायधणे, लाला तरारे,अहमद हुशेन,बोधनकर गुरुजी,अविनाश फुले, ढबाले,आदी मान्यवर हजर होते,
सभेला शासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी बि. वैष्णवी, तुमसर तहसीलदार टेळे, मोहाडी तहसीलदार कारंडे, तालुका मोहाडी कृषी अधिकारी मिरासे,काळे, मेसराम, नंदागवळी, वाडेकर, सभेला हजर होते,
0 Response to "नुकशानग्रस्त शेतीचे तात्काल पंचनामे करून आर्थिक मदत द्या.आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे "
एक टिप्पणी भेजें