कान्हळगाव ग्रामपंचायत येथील दिव्यांगा ची यादी सुपूर्द
भंडारा विशेष प्रतिनिधी :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना चे संस्थापक/संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी कान्ह्ळगाव येथील ग्रामपंचायतला भेट दिली असता ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वरजी मेश्राम यांच्या हस्ते दिव्यांगांच्या उपाय योजना साठी कल्याणार्थ म्हणून दिव्यांगांचे नाव व्यांगता टक्केवारी यादी सुपूर्द केली. सुपूर्द करतेवेळी कान्ह्ळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मेश्राम,सम्राट अशोक सेनेचे तुमसर तालुका अध्यक्ष हरिदास बोरघरे,जनता की आवाज चे तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार,व ग्रामपंचायत शिपाई सचिन वहिले उपस्थित होते.सुपूर्द करतेवेळी दिव्यांगांच्या कल्याणाच्या उपाययोजनांसाठी शासन स्तरावर निवेदन देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
श्रीकृष्ण देशभ्रतार यांना यादी सुपूर्द करतांना सरपंच ज्ञानेश्वर मेश्राम |
0 Response to "कान्हळगाव ग्रामपंचायत येथील दिव्यांगा ची यादी सुपूर्द "
एक टिप्पणी भेजें