राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन नवी दिल्ली येथे
ओबीसींना एकत्र येण्याचे आव्हान : सौ मेघा बिसेन..
संजीव भांबोरे (ऑल इंडिया प्रतिनिधी)
गोंदिया :- 7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात अधिवेशनाची तयारी सुरु आहे.
ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, कलम 243(T) व 243(D) सेक्शन 6 मध्ये बदल करून ओबीसींना 27% आरक्षण साठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृहासाठी, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळण्यासाठी ओबीसी शेतकऱ्यांना 100% सबसिडी वर योजना लाग़ू करण्यात याव्या. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यासाठी, क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासाठी व राज्याच्या व केंद्राच्या इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या बाबींवर अधिवेशनात मंथन होणार आहे. या अधिवेशनासाठी तालुक्यातून केले आहे.
या अधिवेशनाला देशभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची जय्यत तयारीआली राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून कडून अधिवेशनासाठी देशभरातील ओबीसीना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे
0 Response to "राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन नवी दिल्ली येथे"
एक टिप्पणी भेजें