भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जीभकाटे तर उपाध्यक्षपदी चरण वाघमारे गटाचे संदीप टाले
·
भंडारा जिल्हा परिषद मध्ये घडलेला प्रकार निंदनीय
· भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांना सहा वर्षा करता पक्षातून निष्कासित
भाजपाचे माझी आमदार चरण वाघमारे यांचे ६ वर्षाकरिता निलंबन
गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पक्षाला वेठीस धरून मनमर्जी कारभार करणारे भाजपाच्या विरोधात लढणारे आणि लढविणारे चरण वाघमारे यांना भारतीय जनता पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविला आहे .पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाची घोषणा केली .तसेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील भाजपाची तालुका तुमसर, तुमसर शहर ,मोहाडी तालुका ,मोहाडी शहर ,या सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची त्यांनी घोषणा केली.
भंडारा :- दिनांक 10 मे 2022 रोजी रोज मंगळवार ला भंडारा जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष च्या निवडणुकीमध्ये गंगाधर जीभ काटे यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ घातल्या गेली तर भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी चरण वाघमारे गटाचे संदीप टाले गर्रा बघेडा जिल्हा परिषद क्षेत्रात निवडून आलेले (तुमसर )यांची वर्णी लागली . आज झालेल्या जिल्हा परिषद व जिल्हा परिषद उपाध्यक्ष च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडे 21 जिल्हा परिषद सदस्य होते .तर भारतीय जनता पार्टी कडे १२ जिल्हा परिषद सदस्य होते .तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे 13 जिल्हा परिषद सदस्य होते. बहुजन समाज पार्टी 1, शिवसेना १, वंचित बहुजन आघाडी 1 व अपक्ष 3 असे एकूण 52 जिल्हा परिषद संख्याबळ असलेली भंडारा जिल्हा परिषद आहे. या जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व बीजेपी ची युती झाली होती. परंतु ऐन वेळेवर भारतीय जनता पार्टीचे पाच सदस्य माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पाठीशी उभी असल्याने चरण वाघमारे गटाचे संदीप टाले यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी वर्णी लागली. माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या विकास फाउंडेशन ने कोंढा जिल्हा जिल्हा क्षेत्रातून निवडून येणारे व अध्यक्ष पदाकरित उभे असलेले गंगाधर जिभकाटे तालुका पवनी यांना समर्थन दिल्याने काँग्रेसच्या बाजूने एकूण 52 जिल्हा परिषद सदस्य पैकी काँग्रेसच्या बाजूने २७ मते पडली तर विरोधकांच्या बाजूने पंचवीस मते पडली.
भंडारा जिल्हा परिषद सभागृहात घडलेला प्रकार निंदनीय असून महिला जिल्हा परिषद सदस्यांचे मंगळसुत्र तोडण्या पर्यंत काँग्रेस ची मजल गेली .आज भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. तत्पूर्वी सभागृहात भाजपा जिल्हा परिषद सदस्यांना भेट देण्यासाठी गेलेल्या प्रियांक बोरकर ,गणेश निरगुडे, आणि विनोद बांते यांना काँग्रेसच्या आणि भाजपा बंडखोर यांनी धक्काबुक्की करून पायाने मारहाण केली .ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांना धक्का करून गळ्यातील मंगळसूत्र तोडले .वनिता डोये यांच्यावर सुद्धा धावून गेले .तसेच महिलांना अपशब्द बोलत शिवीगाळ केली.
0 Response to "भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जीभकाटे तर उपाध्यक्षपदी चरण वाघमारे गटाचे संदीप टाले"
एक टिप्पणी भेजें