देशाच्या पर्यावरण रक्षणाची गरज आहे
आपला देश विविध प्रकारच्या जमीन, जंगल, जनावर, वातावरण आणि जल नी पूर्ण समृध्द आहे.अशी विविधता जगात कोणत्याच देशाला लाभली नाही आहे.काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असणारा सारा भारत ,सुंदर पर्यावरनाने नटलेला आहे.या पर्यावरनाचे रक्षण म्हणजेच देशाचे रक्षण होय.जल,जंगल,जमीन आणि जनावरचे रक्षण म्हणजेच देशाचे रक्षण होय.हा एक मूळ सिद्धांत समजून घेणे गरजेचे आहे.हा सिद्धांत जर साऱ्या नागरिकांना जर समजला तर अनेक समस्या चुट दिशी सुटून जातील.आज आपल्या पुढे पर्यावरण विषयक किती मोठ्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.त्याचा जेव्हा विचार केला की मानवी जीवन त्या मुळे किती मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहे ,याचा अंदाज येतो.काही प्रमुख उदाहरणे जर तपासली तर सहज लक्ष्यात येते.
गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या आपल्या देशाच्या प्रमुख जीवनदायी नद्या आहेत,यात कोणतीच शंका नाही.मात्र अनेक कारखान्यातील घान पाणी त्यात सोडण्यात येते,अनेक शहरांमधील विष्टा त्यात सोडण्यात येते,मृत पशू आणि मानवी प्रेत या नद्या मध्ये सोडण्यात येतात,विविध प्रकारचा कचरा या दोन्ही नद्यांमध्ये टाकण्यात येतो.त्यामुळे आज गंगा- यमुना नदीचे प्रदूषण एक राष्ट्रीय समस्या झाली आहे.देशात असणारे आताचे जंगल कसे टिकवावे हा एक प्रश्न का निर्माण झाला?याचे उत्तर आपल्याला आता द्यावे लागणार आहे. नाहीतर फार लवकर सुंदर मानवी जीवनाची कल्पना त्यागावी लागणार आहे.आधुनिक नागरीकरनासाठी सिमेंटचे जंगलला प्राथमिकता दिली आणि खरे वृक्षजंगल त्यासाठी कापण्यात आले.याचा गंभीर परिणाम असा झाला की पाण्याची पातळी खोल गेली, तापमानात वाढ झाली, जंगलतोडीमुळे वन्य प्राणी आणि पक्षी बेघर झाले आणि सारे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले.देशातील गाय म्हशीचे पशुधन हेच खरे धन आहे ,याची जाणीव आपण विसरत चाललो आहे.म्हणून गाय -म्हशी कत्तलखानाकडे वळविल्या जात आहेत,त्यामुळेच देशातील सर्व नागरिकांना शुद्ध दूध, तूप, लोणी,दही सहज पने उपलब्ध होत नाही.आणि शेतासाठी फार आवश्यक असणारे शेणखत आता दुर्मिळ झाले आहे. हे ही एक वास्तव आहे. रुपयाच्या हव्यास्या पोटी रेती उत्खनन करून नदीचे नैसर्गिक पात्र नष्ट करण्याचे वाइट कार्य मोठ्या प्रमाणात देशभर सुरू आहे. त्याचा परिणाम पावसाळ्यात बिहार ,बंगाल,आसाम आणि उत्तर प्रदेश या प्रदेशात बघायला मिळतो. नद्या आपले मूळ प्रवाह सोडून नवीन प्रवाहानी प्रवास करताना दिसतात. याचा मोठा गंभीर परिणाम म्हणजे हजारो एकर शेती नष्ट होणे,गावच्या गाव पाण्याखाली येवून जनजीवन विस्थापित होणे.
देशाला आणि येथल्या पर्यावरनाला वाचवयाचे असेल तर सर्वांना मिळून कार्य करावे लागेल. अगदी स्वतःच्या घरा पासून सुरुवात करावी लागेल. कचरा व्यवस्थापन,वीज -पाणी याचा काटकसरीने वापर आदी सारख्या अनेक गोष्टी घरापासून सुरुवात करून पर्यावरणाला पूरक असे आम्ही वागू शकतो.शेती हा विषय सर्वात महत्वाचा आहे . आधुनिक काळात शेती म्हणजे तुच्छ कार्य असे समजण्यात आले आहे.मात्र तसे नाही आहे . शेतकरी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे शेतकरी हे समानार्थी समीकरण आहे .'The discovery of agriculture was the first
step towards a civilized life '.आणि 'A farmer does not grow crops ,A
farmer creater an environment where crops can grow' असे उगाच म्हटल्या जात नाही.
गरीबी,भुख,आर्थिक मागासलेपण,आणि कुपोषणच्या दुष्ट चक्रातून पूर्ण मुक्ती हवी,असेल तर पर्यावरण रक्षण करणे फारच जरुरी आहे. जागतिकीकरनाच्या धडाक्यात जल, जंगलं,जमीन आणि जनावर असे विषय म्हणजे मागासलेले विषय असे समजणे म्हणजे मोठी चूक आहे.
0 Response to "देशाच्या पर्यावरण रक्षणाची गरज आहे"
एक टिप्पणी भेजें