जिल्हा प्रतिनिधीपदी संजय भोले तर उपजिल्हा प्रतिनिधी आशिष चेडगे नियुक्त
भंडारा :- भ्रष्ट्र व्यवस्थेवर लेखणीचा दणका अश्या सडेत्तोड बाणीतील निर्भिड नवप्रहार साप्ताहिक व NP9 नवप्रहार मिडीया भंडारा जिल्हा प्रतिनिधीपदी संजय भोले तर उपजिल्हा प्रतिनिधी आशिष चेडगे यांची नियुक्त भंडारा सर्कीट हाऊस विश्राम गृहात आज दि. १९ एप्रिलला घोषणा करण्यात आली असून भंडारा जिल्हा नवप्रहार मिडीया चमुने त्यांचे अभिनंदन केले आहे. आज दि. १९ ला भंडारा सर्कीट हाऊस येथे नवप्रहार मिडीयाची बैठक संपन्न झाली. बैठकीला नवप्रहार मिडीया मुख्य संपादक संजयराव पांडे अमरावती मुख्यालय यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लाखनी तालुका अध्यक्ष संजय भोले यांची नवप्रहार भंडारा जिल्हा प्रतिनिधीपदी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांची नवप्रहार उपजिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी भंडारा विशेष प्रतिनिधी संजीव जायस्वाल, तुमसर पत्रकार श्रीकृष्ण देशभ्रतार व जिल्ह्यातून पत्रकार बांधव हजर होते. नवप्रहार भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजय भोले व उपजिल्हा प्रतिनिधी आशिष चेडगे यांच्या नियुक्तीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी येथील पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Response to "जिल्हा प्रतिनिधीपदी संजय भोले तर उपजिल्हा प्रतिनिधी आशिष चेडगे नियुक्त"
एक टिप्पणी भेजें